किमया मराठी गोष्टी , ग्रंथ, कादंबरी
मराठी गोष्टी , ग्रंथ, कादंबरी किमया बिदरवाडी नावाचं एक गाव होतं त्या गावात लोकांची सारखी भांडण व्हायची ती भांडणं शेतीच्या जमिनीवरनं व्हायची त्या गावात संख्या जास्त होती त्यामुळे तेथील लोकांना जमीन अपुरी पडू लागली गावातील लोकांना शेती करण्यासाठी जमीन अपुरी पडल्यामुळे काही शेतकरी मोल मजुरी करून जगू लागले जमिनीची कमी उपलब्धता त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यास मन लागेना ते येथील शेतकरी नेहमी पारंपारिक शेती करायचे त्यामुळे त्यांना खर्च जास्त आणि उत्पन्न कमी मिळायचे त्यात त्यांचा शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघत नव्हता त्यामुळे शेतकरी निरास व्हायचे परंतु शेवटी पोटापाण्यासाठी त्यांना शेती करावीच लागत असे गावाकडे सरकारने सुद्धा दुर्लक्ष केले होते या गावात पाण्याच्या साठा होता परंतु जमिनीचा तुटवडा होता त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते गावात शाळा ही सातवीपर्य...