किमया मराठी गोष्टी , ग्रंथ, कादंबरी
मराठी गोष्टी , ग्रंथ, कादंबरी
किमया
बिदरवाडी नावाचं एक गाव होतं त्या गावात लोकांची सारखी भांडण व्हायची ती भांडणं शेतीच्या जमिनीवरनं व्हायची त्या गावात संख्या जास्त होती त्यामुळे तेथील लोकांना जमीन अपुरी पडू लागली गावातील लोकांना शेती करण्यासाठी जमीन अपुरी पडल्यामुळे काही शेतकरी मोल मजुरी करून जगू लागले जमिनीची कमी उपलब्धता त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यास मन लागेना ते येथील शेतकरी नेहमी पारंपारिक शेती करायचे त्यामुळे त्यांना खर्च जास्त आणि उत्पन्न कमी मिळायचे त्यात त्यांचा शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघत नव्हता त्यामुळे शेतकरी निरास व्हायचे परंतु शेवटी पोटापाण्यासाठी त्यांना शेती करावीच लागत असे गावाकडे सरकारने सुद्धा दुर्लक्ष केले होते या गावात पाण्याच्या साठा होता परंतु जमिनीचा तुटवडा होता त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते गावात शाळा ही सातवीपर्यंतच होती त्यामुळे लोक पण फारशी शिकलेली नव्हती त्यामुळे शेती त्यामुळे शेतीत सुद्धा फारशी प्रगती झालेली नव्हती या बिदरवाडी गावातच एक आदित्य नावाचा मुलगा राहायचा त्यांचे वडील बाळकृष्ण मूर्ती व आई मंदाकिनी खूपच कष्टाळू होते आदित्यला शिकण्याची खूपच इच्छा होती त्याला आई-वडिलांनी गावातच पहिली ते सातवीपर्यंत शिकवलं नंतर त्यांच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे त्याला बाहेर शिक्षण घेण्यास जाता आलं नाही त्याने एक वर्षे घरीच शेतीत मदत केली तेव्हा त्याला लोकांची परिस्थिती समजली लोकांच्या अडचणी त्याला लहानपणापासूनच खटकत होत्या त्याला त्या लोकांच्या अडचणी दूर करायच्या होत्या त्याच्या मनात एक कल्पना आली ती असे की गावातील लोकांनी त्याला शिकण्यासाठी मदत करावी म्हणजे सर्वांनी मिळून त्याला शिक्षणासाठी पैसे द्यावे त्याने ती कल्पना आई-वडिलांना बोलून दाखविली परंतु ते म्हणाले की गाववाले तुला शिक्षण घेण्यास पैसे कसे देतील आणि का देतील हे डोक्यातून खुळ काढून टाक असे आई-वडील म्हणाले शेवटी तो निराश झाला परंतु तेव्हाच त्याला एक आठवण झाली की मागील वर्षी तो सातवीत असताना त्यांना एक गुरुजी होते भेंडे मास्तर म्हणून त्यांचे ते खूप आवडते होते त्यांना हे आठवलं की सातवीत असताना गणिताचे विषयांमध्ये एक स्पर्धा झाली होती की त्यामध्ये असं ठरलं होतं की जो गणिताच्या सर्व क्रिया जेवढ्या लवकर जलद गतीने सोडवेल त्याला गुरुजी जे विजेता मागील ते देईल त्यात आदित्य जिंकला होता
![]() |
| Hydroponix Farming |
गुरुजी ने त्याला मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी म्हटले की गुरुजी आता मला काही नको वेळ आल्यावर मागतो आणि तो लगेच भेंडे गुरुजींना भेटायला गेला तिथे गेल्यावर त्यांच्यामध्ये गप्पागोष्टी सुरू झाले शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला असंच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना आदित्यने गुरुजींना बक्षीसाची आठवण करून दिली गुरुजींनी लगेच त्याला सांगितलं काय पाहिजे माग आदित्य म्हणाला की मला तुमची मदत पाहिजे गुरुजी म्हणाले कसली मदत पाहिजे आदित्यने गुरुजींना सर्व किस्सा सांगितला गुरुजी तयार झाले गुरुजींनी त्याला आर्थिक सहाय्य केले लोकांनी सुद्धा गुरुजींना कित्येक वेळा सांगितलं की कशाला शिक्षणासाठी आदीला पैसे देता परंतु गुरुजींनी कुणाचंच ऐकलं नाही आदित्य पुढचं शिक्षण घेण्यासाठी शहरात गेला तिथे त्याने आठवी ते बारावी शिक्षण पूर्ण केलं नंतर शहरातील एका गृहस्थाच्या सांगण्यावरून त्यानं बीएससी ऍग्री कर आणि त्याने बीएससी ऍग्री करण्याच्या ठरवलं आणि त्याने बीएससी ऍग्री चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यामधून तो कृषी अधिकारी झाला आणि गावात आला बिरवाडी त्याच जंगी स्वागत झालं ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावात भाषणे संभाषण झाली आदित्यला बोलताना सुद्धा अश्रू अनावर झाले समारंभ पार पडला नंतर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये गेला आणि सरपंचांना गावातील लोकांना जमवायला सांगितले सरपंचांनी सांगितल्यावर सर्व गाववाले एकत्र जमले नंतर आदित्यने सर्व लोकांना उद्देशून सांगितले की लोकहो आपल्या गावात जमीन कमी आहे त्यामुळे आपल्याला शेती करण्यास जमीन अपुरी पडत आहे त्यामुळे आपण खूपच चिंतित आहोत परंतु आता चिंता करण्याची गरज नाही त्यावर एक उपाय आहे तो तो म्हणजे असा की आपण हायड्रोपोनिक्स नावाची शेती करू शकतो लोकांना हायड्रोपोनिक्स हा शब्द विचित्रच वाटला परंतु त्याने लगेच सांगितले की हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ते असं की पीसी पाईप कुंड्या रोप पाण्यातील रसायने ही त्यांनी सर्व सांगितलं लोकांना त्यातलं थोडं समजलं परंतु लोक तयार झाली त्याने दुसऱ्या दिवशी गाववाल्यांना ते कसं करायचं ते त्याचा घरी प्रॅक्टिकल करून दाखवलं हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याची त्या गाव वाल्यांना चिंता होती एक महिन्यात रोप वाढली आणि त्याला फुल सुद्धा आली गाववाल्यांना सांगितलं प्रयोग यशस्वी झाला आहे मग गाव वाल्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अर्ध्यात एकरामध्ये तसा प्रयोग सुरू केला त्यामध्ये आदित्यने त्यांना खूपच मदत केली त्यांची जोडणी करून दिली रूप कशी लावायची पीसी पाईपला भोकं किती मापाचा पडावं सर्व इस्तंबुत माहिती गाववाल्यांना सांगितली गाववाल्यांनी तसं केलं गाववाल्यांना दोन महिन्यातच त्याचा रिझल्ट समजला गाववाल्यांना याचा खूपच फायदा झाला त्यांना बऱ्यापैकी त्यामधून उत्पन्न मिळाले त्यांनी पूर्ण एकरभर त्याची वाढ करून टाकली आता ते बारमाही शेती करतात आणि तेही कमी जागेत आणि त्यामधून त्यांना दुप्पट तिप्पट उत्पन्न मिळत होते त्यामुळे गाववाले खूपच आनंदी झाले होते ते गावाला त्यांना म्हणायचे की त्या तुझ्यामुळे हा असा गावाचा कायापालट झाला आहे तू आमच्यासाठी एक देव माणूस आहेस तुझ्यामुळे आमच्या जीवनातील चिंता मिटली आहे त्यामुळे सर्व गाववाल्यांनी मिळून आदित्यचा सत्कार करायचं ठरवलं होतं ठरल्याप्रमाणे त्याचा सत्कार झाला आणि त्याचे अध्यक्ष स्वतः जिल्हा कलेक्टर माननीय विश्वास माने साहेब होते त्यांनी सुद्धा आदित्यचे खूपच कौतुक केले शेवटी साहेब आणि सांगितले की आदित्यने या गावात म्हणजेच बिदरवाडीत ती एक केलेली किमयाच आहे. ............ 
Farming of hydroponox
तर धन्यवाद मित्रांनो इथे आपली कथा संपलेली आहे अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि

Comments
Post a Comment